ग्रामीण भागात करण्या योग्य प्रोफेशनल व्यवसाय .

Spread the love

ग्रामीण भागात करता येणारे अनेक प्रोफेशनल व्यवसाय आहेत .जे की, ग्रामीण भागात व्यवसाय करून महिना 15 हजार ते 50 हजार कमवू शकता .

ग्रामीण भागात अनेक प्रोफेशनल व्यवसाय करू शकता ते कोणकोणते आहेत , ते खालीलप्रमाणे आहे .

1) बँकिंग सेवा –

ग्रामीण भागांमध्ये बँकिंग सेवा सुरू करून महिना 15 हजार ते 50 हजार सहज कमवू शकता , यामध्ये केवळ कोणत्या तरी बँकिंग सेवांचे ग्राहक सेवा केंद्र सुरू करून पैसे काढणे पैसे भरणे त्याचबरोबर इतर बँकिंग व्यवहार करून महिना अखेर चांगली कमाई करू शकता .

2) सेतू सुविधा केंद्र –

महाराष्ट्र सरकारने सेतू सुविधा केंद्र खाजगी रित्या चालू करण्यास मान्यता दिली आहे .त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये सेतू सुविधा चालू करून एक चांगला प्रोफेशनल व्यवसाय चालू करू शकता ,यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागत नाही .

3) विमा प्रतिनिधी –

भारतीय जीवन विमा योजना त्याच बरोबर इतर विमा योजनेचे विमा प्रतिनिधी म्हणून काम करून चांगली कमाई करू शकता .विमा प्रतिनिधी म्हणून काम करताना इतर जॉब सुध्दा करू शकता हे केवळ फावल्या वेळेत काम केल्यास चांगली कमाई होऊ शकते .हा एक चांगला प्रोफेशनल व्यवसाय आहे .

4) ATM सुविधा –

ज्या ग्रामीण भागात जास्त वर्दळीच्या ठिकाणी ATM सुविधा चालू करून चांगला कमिशन मिळवू शकता .यासाठी अगोदर गुंतवणूक करावी लागते .व ATM कंपन्या सोबत करार करावा लागतो .ATM सुविधा देणाऱ्या कंपन्यां मध्ये हिताची ,इंडीकॅश,वक्रांगी या कंपनी नावाजलेले असून या कंपनी कमाई करण्यायोग्य कमिशन देतात .

Leave a Comment