इंदिरा आवास योजना अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना आपल्या हक्काचे घर बांधणीसाठी अर्थसहाय्य केले जाते .
योजनेचे नाव – इंदिरा आवास योजना ( 75:25)
योजना कोणामार्फत राबविण्यात येते – केंद्र सरकार व राज्य सरकार संयुक्तपणे (केंद्राचा 75 % हिस्सा तर राज्य शासनाचा 25% हिस्सा .)
योजनेचे उद्दिष्टे – ग्रामीण भागामध्ये वास्तव असणारे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना हक्काचे घर बांधणीसाठी अर्थसहाय्य करणे .
पात्रता –
1) लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा .
2) लाभार्थ्यांचे नाव ग्रामपंचायतिच्या बेघर यादीच्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणे आवश्यक राहील .
निधीचे वाटप – अनुसूचित जाती /जमाती (SC/ST ) प्रवर्गातील लाभार्थी साठी 60 % निधी आरक्षित ठेवण्यात येते ,अपंग लाभार्थ्यां साठी 3 % निधी राखीव ठेवला जातो ,अल्पसंख्याक प्रवर्गातील लाभार्थी साठी 15 % निधी आरक्षित ठेवण्यात येते .
लाभ कसा घ्यावा – सर्व प्रथम लाभ घेण्यासाठी आपले नाव दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे ,किंवा अपंग त्याचबरोबर वरती नमुत केलेल्या प्रवर्गात मोडणे आवश्यक राहील .त्यानंतर आपले नाव ग्रामसेवक कडे बेघर असल्याबाबत नोंद करावा .त्यानंतर प्रतीक्षा यादीनुसार लाभ मिळेल .
या योजनेबाबतचा शासन निर्णय – ईआयो 2010/प्र. क्र.128/योजना-10,दिनांक 2 /07/2010.