केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव 3 % महागाई भत्ता लागू केला आहे .परंतु राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव 3 % महागाई भत्ता अद्याप पर्यंत लागू केला नाही .
हा वाढीव महागाई भत्ता मागील 18 महिने गोठवण्यात आलेला महागाई भत्ता बद्दल केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केला आहे .राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता गोठवण्यात आला होता .यावर राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही .
याबाबत राज्य सरकारी कर्मचारी संघटना कडून 18 महिने गोठवण्यात आलेला महागाई भत्ता बाबत वन टाइम सेटलमेंट करावी अथवा केंद्राप्रमाणे 3 % वाढीव महागाई भत्ता त्वरित लागू करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली होतो .
केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव 3 % महागाई भत्ता 01/07/ 2021 पासून लागू करण्यात आला आहे .राज्य सरकारने सुद्धा महाराष्ट्र शासन सेवेतील अखिल भारतीय सेवा मधील अधिकारी /कर्मचाऱ्यांना व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव 3 % महागाई भत्ता 01/07/2021 पासून लागू केला आहे .
माहे डिसेंबर 2021 अखेर राज्य सरकारी कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे .
त्याचबरोबर मागील जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या तीन महिने महागाई भत्ता थकबाकी बाबत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे .