शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मधील वार्षिक दरवाढ मध्ये वाढ होणार आहे. सर्वसाधारणपणे महागाई भत्ता हा बाजार भावाच्या महागाईनुसार कर्मचाऱ्यांना दिला जातो .मागील दोन वर्षापासून केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता गोठवण्यात आलेला होता. परंतु आजच्या बाजारभावानुसार सरकारने केलेली महागाई भत्ता मधील वाढ परवडणारी नाही.
अर्थतज्ञाच्या मते, कोरोना महामारी मुळे बाजारभावाची महागाई जास्तच वाढली आहे .या बाजारातील महागाईचा विचार करता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता दर मध्ये वाढ करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक महागाई भत्ता दर मध्ये वाढ करणे प्रस्तावित आहे .कारण याचा परिणाम शहरी भागामध्ये वास्तवास असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाजारभावाची महागाई परवडणारी नाही.
राज्य सरकारी कर्मचारी संघटना कडून सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या वार्षिक महागाईभत्ता दराचे पुनर्विचार करून या वार्षिक वाढीच्या दरामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
यावर केंद्र व राज्य सरकार कडून पुनर्विचार केला जाणार आहे व वर्षातून दोनदा दिला जाणारा महागाईभत्ता दर वाढिमध्ये वाढ करण्यात येणार आहे.