शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रलंबित कामकाज डिसेंबर अखेर करण्याबाबत शासन निर्णय.

Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे अनेक कामकाज संबंधित आस्थापना अधिकारी यांच्याकडून विलंब होत असल्याचे राज्य शासनास निदर्शनास आल्याने याबाबत सर्व प्रलंबित कामकाज 31 डिसेंबर 2021 अखेर पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.

या शासन निर्णयामध्ये असे सांगण्यात आले आहे की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रलंबित कामकाज वेळेवर पूर्ण होत नसल्याने कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना, पदोन्नती, पन्नास-पंचावन्न वर्ष पुनर्विलोकन, परिविक्षाधीन कालावधी, स्थायित्व प्रमाणपत्र, याबाबत लाभ वेळेवर देता येत नाही यासाठी कर्मचाऱ्यांचे सर्व प्रलंबित कामकाज डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात यावे.

हे कामकाज संबंधित आस्थापना अधिकारी यांच्याकडून वेळेवर करण्यात यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

शासन निर्णय.

Leave a Comment