कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रश्नावर हिवाळी अधिवेशनामध्ये होणार निर्णय.

Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वाढीव तीन टक्के महागाई भत्ता, महागाई भत्ता थकबाकी, सातवा वेतन आयोगाचा पहिला / दुसरा हप्ता ,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न या सर्व बाबींवर हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय होणार आहे.

येत्या 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर 20 21 या कालावधीमध्ये हिवाळी अधिवेशन मुंबई येथे होणार आहे .

राज्य शासकीय कर्मचार्‍यांच्या बाबतीत प्रलंबित असणारे महागाई भत्ता ,महागाई भत्ता थकबाकी ,सातवा वेतन आयोगाचे पहिला/ दुसरा हप्ता तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न जसे की आश्वासित प्रगती योजना ,पेन्शन विक्री अशा सर्व प्रश्न कर्मचाऱ्यांच्या वतीने कर्मचारी संघटना कडून येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार आहेत.

आणखीन प्रलंबित असणारे प्रश्न कर्मचारी संघटनाना कळवणे अपेक्षित आहे. या सर्व प्रलंबित प्रश्नावर हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा होईल व कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली लागतील.

Leave a Comment