निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावामध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष ,त्याचबरोबर ज्या कर्मचारी व अधिकारी यांची एकूण सेवा कालावधी 33 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सक्तीची सेवानिवृत्ती असाही प्रस्ताव यामध्ये होता. परंतु महाराष्ट्र राज्याचे उपसचिव त्याचबरोबर जनतेकडून सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास बेरोजगारीची संख्या वाढेल म्हणून हा प्रस्ताव लागू केला नाही.
या प्रस्तावामध्ये जे कर्मचारी /अधिकारी वयाच्या 19 ते 24 वय वर्ष असताना शासकीय सेवेत रुजू झाले आहे .अशा कर्मचाऱ्यांना 33 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर सक्तीची सेवानिवृत्ती देण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने तयार केला होता .हा प्रस्ताव 2019 पासून प्रलंबित होता.
परंतु राज्य शासनाच्या विविध विभागाकडून 33 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्यास राज्य शासनाकडून शासकीय कार्यालयांना आदेशित केले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना 60 वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.