महागाई भत्ता बाबत AICPI निर्देशांकाचा डेटा जाहीर .

Spread the love

मराठी संहिता – वृत्तवाहिनी

मुंबई – माहे नोव्हेंबर महिन्यातील AICPI निर्देशांकाचा डेटा जाहीर झाला आहे .यामध्ये निर्देशांकाचा डेटा 125.7 वर गेला आहे .याचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 33 % वाढ अपेक्षित आहे .हा डेटा डिसेंबर महिन्यापर्यंतचा आहे .

जानेवारी महिन्यात CPI चा आकडा 130 % जाण्याची शक्यता आहे .यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 % ने वाढू शकतो .म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये एकूण 3% ते 6% वाढ होईल .यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 34 % होईल .ही वाढ कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2022 पासून लागू होईल.

फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होण्याची शक्यता –

केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 % वाढ करण्याची मागणी होत आहे.फेब्रुवारी महिन्याच्या अर्थसंकल्पा मध्ये फिटमेंट फॅक्टर संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे .फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांचा किमान वेतन 18000/- होईल .याचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता,घरभाडे भत्ता ,वाहन भत्ता मध्ये वाढ होईल. या अगोदर 2016 साली कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाली होती ,या वर्षी फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होणे अपेक्षित आहे .

कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार .

केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे कारण ,फिटमेंट फॅक्टर 3.68% झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होईल .

वेतनात किती वाढ होईल .

फिटमेंट फॅक्टरचा प्रत्यक्ष संबंध मूळ वेतनाशी असल्याने त्याचा परिणाम मूळ वेतनावर होतो .आपल्या मूळ वेतनाच्या 3.68 % वाढ होईल .परंतु किमान मूळ वेतन 18000 /- झाल्यास त्याचा वेतनामध्ये मोठी वाढ.यामुळे वेतनात किमान 6 हजार ते 18 हजार वाढ होईल .

Leave a Comment