बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा मागील तीन महिन्यांपासून संप चालूच आहे ,यावर कोणताही तोडगा निघत नसल्याने बस महामंडळ कडून खाजगी चालक व वाहकांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे .असे बस महामंडळ कडून स्पष्ट केले आहे .
आतापर्यंत 750 खाजगी कंत्राटी चालकांची भरती बस महामंडळ मध्ये करण्यात आली आहे .शिवाय बस महामंडळ मधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कंत्राटी पध्दतीने सेवेत घेण्यात येणार असल्याचे महामंडळ कडुन स्पष्ट केले आहे.
बस महामंडळ मधून सुमारे 2 हजार कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत .या सेवा समाप्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना परत सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सोपी नसल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ केले जावू शकते .कारण एकदा सेवेतून बडतर्फ केल्यानंतर परत सेवेत सामावून घेणे कायद्यानुसार अवघड आहे .
खाजगी कंत्राटी चालकांची भरती होणार.
खाजगी चालकांची भरती बस महामंडळ कडून केली जाणार आहे .त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना परत सेवेत घेतले जाणार असल्याचे बस महामंडळ कडून स्पष्ट भूमिका घेतली आहे .
बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप कायम –
बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून ,विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट केले आहे .
आतापर्यंत 750 खाजगी चालकांची भरती –
आतापर्यंत 750 खाजगी चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेली आहे ,यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच खाजगी चालकांना घेण्यात आले आहेत .