फिटमेंट फॅक्टर वाढीमुळे मूळ वेतनासह ,DA ,HRA व इतर भत्ते मध्ये होणार बदल !

Spread the love

सध्या कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर वाढण्याची चर्चा केंद्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे .फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 % ने वाढ करावी अशी कर्मचारी व कामगार युनियनची मागणी आहे .याबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा सुरू असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे .

फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होईल ,त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना देय असणाऱ्या महागाई भत्ता ,घरभाडे भत्ता ,वाहन भत्ता मध्ये सुद्धा बदल होईल .फिटमेंट फॅक्टर मुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 8000/- तर राज्य कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6000/- रुपये ने वाढ होणार आहे .

मूळ वेतनात मोठी वाढ होत असल्याने केंद्रीय स्तरावर महागाई भत्ता मोजणी करण्याच्या सूत्रामध्ये बदल केला जाणार आहे .त्यामुळे घरभाडे , वाहनभत्ता मोजणी मध्ये सुध्दा बदल होईल .ही मोजणी 1963 – 65 च्या WRI सिरीज नुसार करण्यात येईल .

सध्या 7 वा वेतन लागू असल्याने 7 वा वेतन श्रेणी मध्ये सुद्धा बदल होईल .केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रथम फिटमेंट फॅक्टर लागू केला जाईल ,त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा वाढीव फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू होतील .

यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात 8 ते 20 हजार रुपयांची वाढ होईल तर राज्य कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात 6 ते 12 हजार रुपयांची वाढ होईल .

1 thought on “फिटमेंट फॅक्टर वाढीमुळे मूळ वेतनासह ,DA ,HRA व इतर भत्ते मध्ये होणार बदल !”

  1. Fitment factor kadhi lagu honar yachi sarvrv karmchari lakanna aasha lagali aahe tashech pentioner Lok pan aahe tari tari krupya vinati aahekki lavkar lagu karava hi vinanti aahe Barte bhausaheb pentioner ZPNASHik

    Reply

Leave a Comment