30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 01 जुलैची काल्पनिक वेतनवाढ.

Spread the love

राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 01 जुलै ची वार्षिक वेतनवाढ बाबत शासनाने यावर रिट पिटीशन दाखल करण्यात आले होते .यावर सर्वोच्च न्यायालयाने त्याच बरोबर मद्रास न्यायालय व महाराष्ट्र उच्च न्यायालयाने हा शासनाचा रिट पिटीशन फेटाळला आहे .

यामुळे 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 01 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .याबाबत राज्य शासनाकडून कोणताही निर्देश देण्यात आलेले नाही परंतु याबाबत शिक्षण विभाग ,नागपूर कार्यालयाने संबंधित शिक्षक व संवर्गातील कर्मचाऱ्यांना 01 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ लागू करून सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्त नंतरचे आर्थिक लाभ लागू करण्यात आले आहे .याबाबत संबंधित कार्यालयाने सविस्तर परिपत्रक निर्गमित केले आहे .

सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय व मद्रास न्यायालय यांचा संदर्भ घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांने कार्यालयात 01 जुलै ची वेतनवाढ लागू करण्या संदर्भात अर्ज सादर करावयाचा आहे .संबंधित अर्जास न्यायालयाचा निकाल व शिक्षण विभाग नागपूर यांचा परिपत्रक जोडून अर्ज सादर करावा .

न्यायालयाने असा निकाल दिला आहे की, कर्मचाऱ्यांना वर्षभर सेवा केल्यानंतर 01 जुलै रोजी वेतनवाढ दिली जाते ,त्यामुळे कर्मचारी वर्ष भर सेवा करून केवळ 01 दिवसामुळे वेतनवाढ मिळत नाही .ही 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ मिळण्याचा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे .असा निकाल न्यायालयाने दिला आहे .

याबाबतचा परिपत्रक व न्यायालय निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा .

30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या व झालेल्या कर्मचाऱ्यांना 01 जुलैची वेतनवाढ लागू करण्याबाबत न्यायालयचा /कोर्ट निकाल .येथे क्लिक करा.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 01 जुलैची वेतनवाढ लागू करण्याबाबतच परिपत्रक डाउनलोड करा .येथे क्लिक करा.

Leave a Comment