महाराष्ट्र सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्यामार्फत राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी माननीय नामदार श्री अजित दादा पवार यांना मागणी पत्र सादर केले आहे यामध्ये कोणकोणत्या प्रलंबित मागणी सादर करण्यात आले आहे ते खालील प्रमाणे आहेत.
1) माननीय बक्षी समिती खंड 2 अहवाल – माननीय बक्षी समिती खंड 2 मधील सहाव्या वेतन आयोगातील त्रुटींवर पुनर्विचार करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्यात आले आहे या अहवालाला त्वरित मान्यता देण्यात यावी
2) वाढीव 3 % महागाई भत्ता – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार क्रमाने वाढीव तीन टक्के महागाई भत्ता केंद्राप्रमाणेच 01 जुलै 2021 पासून लागू करण्यात यावा .
3) रिक्त पदावर भरती प्रक्रिया – रिक्त पदांवर तात्काळ भरती करण्यात यावी कारण याचा कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.म्हणून तात्काळ भरती प्रक्रिया करण्यात यावे .
याबाबतचा सविस्तर पत्र खालीलप्रमाणे आहे .
