महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव 3 % महागाई भत्ता जानेवारी वेतनासोबत रोखीने दिला जाणार आहे ,हा वाढीव 3 % महागाई भत्ता 01 जुलै 2021 पासूनच लागू करण्यात येणार आहे .
विविध राज्य शासकीय कर्मचारी संघटनाकडून 01 जुलै 2021 पासूनचा महागाई भत्ता फरक त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर 2021 या तीन महिने कालावधी मधील 11 % महागाई भत्ता वाढची महागाई भत्ता फरक जानेवारीच्या वेतन देयकासोबत रोखीने देण्यात यावे ,अशी तीव्र मागणी होत असल्याने ,राज्य शासनाचे वित्त विभागासोबत या वर्षाचा महसूली खर्च वजा जाता ,महागाई भत्ता फरकाच्या रक्कमासाठी अनुदान किती शिल्लक राहील यासाठी चर्चा सुरू आहे .
जर वार्षिक खर्च वजा जाता अनुदान शिल्लक राहिल्यास ,त्या अनुदानातुन 01 जुलै 2021 पासूनचा महागाई भत्ता फरकाची रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे .
त्याचबरोबर सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता बाकी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या आर्थिक वर्षापूर्वी रक्कम अदा केली जाणार आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 3 % महागाई भत्ता त्याचबरोबर महागाई भत्ता फरक जानेवारीच्या वेतन देयकासोबत अदा करण्याबाबत राज्य शासनाची वित्त विभागासोबत चर्चा सुरू असून जानेवारीच्या वेतनासोबत वाढीव 3% DA व DA फरक अदा केला जाणार आहे .
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारीच्या वेतनासोबत मोठी रक्कम मिळणार आहे .याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या आयकर रक्कमेमध्ये वाढ होणार आहे .