केंद्र सरकारने महागाई भत्ता मध्ये आणखीन 14 % वाढ केली असून याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे .केंद्र सरकारच्या सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस (CPSEs) मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना ही वाढ लागू केली आहे .
CPSEs मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ताचे दर मध्ये सुधारणा करून ,14 % महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे .जे की अगोदर 170.5 % दराने महागाई भत्ता मिळत होता ,14 % महागाई भत्ता वाढीमुळे आता या कर्मचाऱ्यांना 184.1% दराने महागाई भत्ता मिळणार आहे .
त्याचबरोबर केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 मधील महागाई भत्ता वाढीबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असून ,जानेवारी 2022 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 % महागाई भत्ता वाढ प्रस्तावित आहे .याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल .
केंद्र सरकारने जानेवारी 2022 मध्ये DA मध्ये वाढ केल्यास निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळेल .
त्याचबरोबर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबरोबर घरभाडे भत्ता मध्ये देखील वाढ करण्याच्या तयारीत आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे .