महाराष्ट्र राज्य शासनाने दि. 01 .02.2022 रोजी शासन निर्णय काढुन राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागांतर्गत स्वयंसेवी संस्था मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात सुधारणा करण्यात आली असुन ही वेतनवाढ 01 जुलै 2021 पासुन लागु करण्यात आली आहे .या कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2021 पासुनचा फरक सुद्धा देण्यात येणार आहे. यामध्ये अधिक्षक , स्वयंपाकी ,मदतनीस व चौकीदार पदांच्या मानधनात वाढ केली आहे .ही मानधन वाढ संदर्भ दि.08 जुलै 2019 च्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत असलेले मानधन व सुधारीत मानधन खालील प्रमाणे आहे.
अ.क्र | पदाचे नाव | सध्याचे मानधन | सुधारीत मानधन |
1. | अधिक्षक | 9200/- | 10,000/- |
2. | स्वयंपाकी | 6900/- | 8500/- |
3. | मदतनिस | 5750/- | 7500/- |
4. | चौकिदार | 5750/- | 7500/- |
सविस्तर शासन निर्णय साठी खालील लिंकवर क्लिक करुन सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करु शकता.