केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या NPS नियोक्त्याचे योगदान वाढवण्यात आले.

Spread the love

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 2022 अर्थसंकल्प सादर केले असुन , केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे NPS योजनेतील योगदानामध्ये समानता आणण्याचा प्रस्ताव दिला आहे.

NPS  पेन्शन योजना ही केंद्र सरकारमाफत चालवली जात असल्याने राज्य शासनाच्य सेवत कार्यरत असलेल्या NPS  योजनेतील कर्मचाऱ्यांना हे केंद्रीय NPS  योजना प्रणालीचे नियम लागु राहतील. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे NPS मधील नियोक्त्याचे योगदानाची वजावट 10 टक्के वरुन 14 टक्के वाढवण्यात आली आहे. परंतु निमशासकीय  व गैरसरकारी कर्मचाऱ्यांसाठी  ह्या योगदानात वाढ केली नाही.यामुळे केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या NPS मध्ये समानता येईल असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी निमुद केले आहे.

त्याचबरोबर NPS योजनेतील राज्य शासनाचे योगदान 10 टक्केवरुन 14 टक्के करण्यात आली आहे.   तसचे या योजनेअंतर्गत नियोक्त योगदान आयकर कलम 80 क क ड अंतर्गत वजावटीस पात्र राहतील.त्याचबरोबर कलम 80  क अतंर्गत उपलब्ध असलेल्या दिड लाख पेक्षा अधिक कर लाभ घेणाऱ्यांसाठी कलम 80 क क ड ( 1 ब ) अंतर्गत पन्नास हजार रुपये वजावट मिळेल.

Leave a Comment