पेन्शनधारकांना पेन्शन वेळेत व विलंब झाल्यास व्याजासकट मिळणार ,महत्वाचा निर्णय .

Spread the love

पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी आली आहे . पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नविन आदेश जारी झाले आहेत . या नविन आदेशानुसार पेन्शनधारक कर्मचाऱ्यांचे पेन्शन  महीनाच्या शेवटी बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . यापुर्वी महीना संपल्यानंतर दुसऱ्या महीन्यात पेन्शन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत होती .

त्याचबरोबर पेन्शनची रक्कम बँकांना दोन दिवसापुर्वी वर्ग करण्यात येईल .जर पेन्शनधारकांचे पेन्शन वेळेत अदा न केल्यास 8 टक्के दराने व्याजासकट पेन्शन देण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत सेवानिवृत्ती निधी संस्था मार्फत 13 जानेवारी 2022 रोजी परीपत्रक निर्गमित झाले असुन पेन्शन वेळेत अदा करण्याबाबतचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशित करण्यात आले आहे .

यामुळे पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना पेन्शनची रक्कम वेळेत मिळणार आहे.जर पेन्शनची रक्कम वेळत न मिळाल्यास पेन्शनची रक्कम 8 व्याजासकट देण्याबाबत आरबीआयने बँकांना आदेशित केले आहे .

Leave a Comment