18 महीने थकीत महागाई भत्ताचा बाबत होणार वन टाईम सेटलमेंट.

Spread the love

केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा कोरोना महामारीमुळे 18 महीने महागाई भत्ता गोठविण्यात आला होता .या कालावधी मधाल सेवानिवृत्त झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ,सेवानिवृत्त कालावधीनुसार वाढीव महागाई भत्ता देण्यात आला आहे.

      या 18 कालावधी मधील गोठवण्यात आलेल्या महागाई भत्ता बाबत वन टाईम सेटलमेंट करण्यात यावी अशी कामगार युनियनची जोरदार मागणी सुरु आहे . याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा यासाठी केंद्रीय युनियनची वारंवार निवेदन देण्यात आले आहेत.त्याचबरोबर विविध राज्य शासकिय कर्मचारी संघटनांकडुन देखील राज्य शासनास वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत.

परंतु केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतल्याशिवाय , राज्य शासनाकडुन निर्णय येणार नाही. या कालावधी मधील महागाई भत्ता साठी वन टाईम सेटलमेंट करावी म्हणजेच महागाई भत्ता मध्ये एकदाच 5 टक्के ते 7 टक्के वाढ करण्यात येणार आहे .अथवा या कालावधी मधील महागाई भत्ता निर्देशांकानुसार महागाई भत्ता फरक दिला जाणार आहे .

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाची याबाबत लवकरच कॅबिनेट बैठक होणार आहे . या बैठकीत कर्मचाऱ्यांचा 18 महीने कालावधी मधील महागाई भत्ता बाबत महत्वपुर्ण चर्चा होणार आहे.

कर्मचाऱ्यांना या 18 महीन कालावधी मधील महागाई भत्ता फरक मिळाल्यास , कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.

Leave a Comment