एस टी कर्मचाऱ्यांचा संप आणखीण चालुच राहणार संपाबाबत महात्वपुर्ण अपडेट .

Spread the love


महाराष्र्म राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप मागील चार महीन्यापासुन चालुच आहे .अखेर कर्मचाऱ्यांचा संपण्याच्या आशा सर्वांना वाटत होती . परंतु संप अद्यापर्यंत संपला नसुन आणखीण दोन आठवडे संप चालुच राहणार असल्याची माहीती कर्मचाऱ्यांकडुन आली आहे.


एस टी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवत विलीनिकरण करावे या प्रमुख मागणीसाठी बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा दि.27 ऑक्टोबर पासुन राज्यव्यापी संप सुरु आहे .या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने अहवाल सादर करण्यासाठी आणखीण दोन आठवड्यांची तोंडी मुदतवाढ मागितल्याने कर्मचाऱ्यांचा हा संप आणखीण दोन आठवडे पुढे चालुच राहणार असल्याची चिन्हे दिसुन येत आहेत. यापुर्वी या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवड्यांची मुदत देण्यात आलेली होती.त्यांची ही मुदत दि.03.02.2022 रोजी संपल्याने समितीने आणखीण दोन दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.


आतापर्यंत जवळपास 11 हजार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे , त्याचबरोबर सुमारे 650 कर्मचाऱ्यांना सेवेतुन बडतर्फ करण्यात आलेले आहेत.शिवाय 80पेक्षा एस .टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे.


संप कधी मिटणार ?


एस.टी कर्मचाऱ्यांना संप आणखीण चालुच राहणार असल्याची चिन्हे दिसुन येत आहेत , सध्या कंत्राटी वाहनचालक व वाहक मार्फत बस चालविण्यात येत आहेत .काही ठिकाणी कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत .प्रवाशांची हाल होवू नये यासाठी महामंडळाने हा कंत्राटी चालकांच्या हाती बस दिली आहे .
समितीने अहवाल सादर करण्यासाठी आणखीण दोन आठवड्यांचा अवधी मागितल्याने संपावर निर्णय लांबणीवर जाणार आहे.

Leave a Comment