राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ ! महागाई भत्ता फरक ,3 टक्के DA वाढीसह फेब्रवारीच्या वेतन देयकासोबत.

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी आली आहे . ती म्हणजेच राज्य शासकिय व सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे फेब्रवारीच्या वेतन देयकासोबत केंद्र सरकार प्रमाणे वाढीव 3 टक्के महागाई मिळणार आहे .

  त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना हा वाढीव 3 टक्के महागाई भत्ता 01 जुलै 2021 पासुनच लागु करण्यात येणार असुन ,01 जुलै 2021 पासुनचा महागाई फरक सुद्धा फेब्रुवारीच्या वेतन देयकासोबत देण्यात येणार असल्याने राज्य शासकिय व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा  आर्थिक दिलासा मिळणार आहे.

   त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधी मधील बाकी असणार महागाई भत्ता 11 वाढीचा फरक देखिल दिला जाणार आहे.

महागाई भत्ता होणार 31 % –

राज्य शासकीय व सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी 2022 पासून 3 % वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार असल्याने आता या कर्मचाऱ्यांना 31 % दराने महागाई भत्ता मिळणार आहे .

Leave a Comment