इपीएफ पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांचे किमान पेन्शन खुपच अत्यल्प असल्याने , कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होत नसल्याचे दिसुन येत असल्याने , कर्मचाऱ्यांकडुन किमान पेन्शन 9 हजार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संसदेच्या स्थायी समितीने कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शन 1000 रुपयावरुन वाढवुन 3 हजार रुपये करण्याची शिफारस केली आहे .परंतु सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडुन किमान पेन्शन 9 हजार करण्याची मागणी जोर धरुन आहे. जर किमान पेन्शन 9 हजार झाले तरच कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे .
भारतीय मजुर संघाने किमान पेन्शन ही 5 हजार करण्यात यावे ,जेणेकरुण कर्मचाऱ्यांना या योजनेचा योग्य लाभ मिळेल .सद्धा देशातील पाच राज्यांमधील निवडणुका तोंडावर आल्याने कर्मचाऱ्यांकडुन हा मुद्दा वर उचलुन घेतला जात असल्याने कर्मचाऱ्यांचा या प्रश्नावर सरकारकडुन सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता वाटत आहे.
किमान पेन्शन 9 झाल्यास देशातील 50 लाख पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना या योजनेचा आर्थिक लाभ मिळणार आहे.