राज्य कर्मचाऱ्यांचा विविध प्रलंबित मागणसाठी 23 व 24 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी संप !

Spread the love

 राज्यातील सर्व कर्मचारी येत्या 23 व 24 फेब्रुवारी 2022 रोजी  विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे यासाठी संपावर जाणार आहेत .राज्यातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागत आहेत .

    यासाठी राज्य सर्व कार्यालयातील कर्मचारी येत्या 23  व 24 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार आहे .विशेष म्हणजे या संपामध्ये केंद्रीय व राज्य बँक कर्मचाऱ्यांचाही देखील सहभाग घेणार असल्याची माहीती कर्मचाऱ्यांकडुन देण्यात आली आहे.कर्मचाऱ्यांकडुन प्रलंबित मागण्याचे सविस्तर निवेदन मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहेत .

कर्मचाऱ्यांचे कोणकोणत्या मागण्या आहेत –

  1. राज्य शासनाच्या प्रशासनामधील सुमारे अडीच लाखापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत ,या पदावर कंत्राटी पद्धतीने भरती प्रकिया न करता नियमित शासन वतेनश्रेणीवर भरण्यात यावीत .
  2. 5 व्या व 6 व्या वेतन आयोगातील वेतनाच्या त्रुटी बाबतच्या सादर करण्यात आलेल्या  खंड – 2 अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी .
  3. सातव्या वेतन आयोग थकबाकीचा तिसरा हप्ता तात्काळ अदा करण्यात यावे .
  4. केंद्र सरकार व  अन्य राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे .त्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावी .
  5. सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारने लागु करण्यात आलेले महागाई भत्ता , वाहन भत्ता व इतर भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना तात्काळ लागु करण्यात यावे .
  6. विविध कार्यालयामधील रखडण्यात आलेली बढती प्रक्रिया विलंब न करता तात्काळ बढती संदर्भात कार्यवाही करण्यात यावे.
  7. महील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी महिलांच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात यावीत .
  8. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनाचा लाभासाठी एस – 20  ची मर्यादा काढण्यात यावी.
  9. 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावे .

Leave a Comment