फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढण्याच्या प्रस्तावावर सरकार सकारात्मक , मुळ वेतनात होणार वाढ .

Spread the love

 बऱ्याच दिवसापासुन कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होण्याची चर्चा जोरदार सुरु आहे . या फिटमेंट वाढीच्या प्रस्तावर केंद्र सरकारकडुन हिरवा कंदील देण्यात आला आहे . त्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी खुशखबर मिळणार आहे.

सध्या कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर  प्रमाणे वेतन मिळत आहे . या अगोदर केंद्र व राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅटर मध्ये वाढ केली होती .

     कर्मचारी युनियन कडुन फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 टक्के वाढ  करण्याची मागणी केली जात आहे , यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 18 हजार वरुन 26 हजार होणार आहे , तर राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचा वेतनाचा फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्केने वाढविल्यास राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन 15 हजार वरुन 21100/- रुपये होणार आहे .

  फिटमेंट फॅक्टर वाढीमुळे इतर देय भत्ते मध्ये होणार वाढ .

फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ केल्यास निश्चितच , कर्मचाऱ्यांना देय असणाऱ्या भत्ते मध्ये देखील वाढ होईल .जसे कि महागाई भत्ता , वाहनभत्ता , धुलाई भत्ता , प्रोत्साहन भत्ता इ. भत्यामध्ये वाढ होईल.

    फिटमेंट फॅक्टरच्या वाढीमुळे सुमारे 50 लाख तर , राज्यातील 5 लाख कर्मचाऱ्यांच्या पहिल्या टप्यात मुळ वेतनात वाढ केली जाईल .या वाढीबाबत केंद्र व राज्य कर्मचारी  अनेक दिवसापासुन प्रतिक्षेत आहेत . याबाबत केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडुन लवकरच निर्णय घेतला जाणार आहे .

Leave a Comment