कोरोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांचा 18 महिने कालावधी मध्ये महागाई भत्ता गोठावण्यात आला होता . या कालावधीमध्ये सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना केंद्राने सेवानिवृत्तीच्या कालावधीनुसार महागाई भत्ता अदा करण्यात आला आहे .
परंतु राज्या शासनाच्या सेवेतील 18 महिने कालावधीमध्ये सेवानिवृत्ती झालेले कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अद्याप पर्यंत निर्णय घेतला नसल्याने या कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेले कर्मचारी मध्ये मोठी नाराजगी दिसुन येत आहे .
याबाबत विविध राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडुन निवेदने देवून , राज्य कर्मचाऱ्यांना व 18 महिने कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे महागाई भत्ता लागु करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली होती .
याबाबत कर्मचाऱ्यांकडुन मोठ्या प्रमाणात जोर धरले जात असल्याने सरकारकडुन याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे .त्याचबरोबर केंद्र सरकारकडुन या 18 महीने कालावधील महागाई भत्ता बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे . कारण केंद्राच्या कर्मचारी युनियन कडुन या 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता त्वरीत लागु करण्याबाबतचा मुद्दा मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे .
यामुळे केंद्र सरकार या 18 महीने कालावधी मधील महागाई भत्ता बाबत लवकरच निर्णय घेवुन अधिकृत घोषणा केली जाणार आहे .या कालावधी मधील महागाई भत्ता फरक मिळाल्यास कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .जवळपास 2 लाख ते 7 लाख पर्यंतची महागाई फरकाची रुक्कमाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे .