एस टी कर्मचाऱ्यांना मागील चार महीन्यापासुन संप चालु आहे तरीसुद्धा या संपावर अद्यापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही .परंतु आता या कर्मचाऱ्यांना मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे .
विलिनीकरण बाबत अहवाल 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनास दिले होते , परंतु राज्य शासनाकडुन आणखीण मुदतवाढ मागण्याची मागणी होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनास कालच दि.12.02.2022 रोजी रात्रीच कोर्टात विलीनिकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले ,व राज्य शासनाने देखिल हा अहवाल कालच दि.12.02.2022 रोजी रात्री अहवाल कोर्टात सादर केला आहे .
यापुर्वी मुंबई उच्च न्यायालयाने 12 आठवड्यांची मुदत अहवाल सादर करण्यास दिलेली होती .ही मुदत दि.10.02.2022 रोजी संपली होती ,परंतु राज्य शासनाचा अहवाल अपुरा असल्याने आणखीण मुदतवाढ राज्य शासनाने मागितली होती .व न्यायालयाने मुदतवाढही देण्यात आली होती .
परंतु वारंवार मुदतवाढ देण्यात आल्यास संप असाच वाढत जाईल , यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनास अहवाल सादर काल रात्रीच अहवाल सादर करण्यास निर्देश दिले .
या अहवालावर 22 फेब्रुवारी 2022 रोजी सुनावणी होणार असल्याने , एस टी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .