महाराष्ट्र्र राज्य शासन सेवेतील सरकारी , निमसरकारी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दि .23 व 24 फेब्रवारी 2022 रोजी राज्यव्यापी संप केला आहे . जर राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या नमुद मागण्या विहीत वेळेत पुर्ण न केल्यास कर्मचारी या दोन दिवशी काम बंद आंदोलन करणार असल्याने राज्य शासनाचे मोठे नुकसान होणार आहे .
त्यामुळे या मागणीपत्रामध्ये एकुण 14 मागण्या आहेत यामध्ये सरकारी, निमसरकारी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक व प्रशासकिय मागण्या आहेत .ह्या मागणीवर राज्य शासनाकडुन दि.23 फेब्रवारी 2022 पुर्वी चर्चा करुन निर्णय न घेतल्यास ,कर्मचारी दोन दिवस संपावर जाणार आहेत.
राज्यातील सर्व कर्मचारी एकाचा दिवशी संपावर जाणार असल्याने प्रशासकिय कामकाजावर मोठा विपरीत परिणाम होणार असल्याने राज्य शासनाकडुन दि.23 फेब्रुवारी 2022 पुर्वी वित्त विभागासोबत चर्चा करुन वाढीव महागाई भत्ता व इतर प्रलंबित बाबींवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडे आलेल्या वाढीव 3 टक्के महागाई भत्ता बाबत सकारात्मक चर्चा ,वित्त विभाग व राज्य सरकारची झालेली आहे . त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव 3 टक्के महागाई भत्ता बाबतचा अधिकृत शासन निर्णय दि.23 फेब्रवारी 2022 पुर्वीच निर्गमित होईल.