देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने , गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहेत . यासाठी केंद्रीय व राज्य शासनाच्या कामगार मंत्रालयामार्फत ई –श्रम कार्ड काढण्यात येत आहेत . जेणेकरुन देशातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिले जाणार आहे .यासाठी सद्या ऑनलाईन आवेदन करणे सुरु असुन ऑनलाईन ई-श्रम कार्ड साठी आवेदन करु शकता .
ई-श्रम कार्डचे फायदे –
देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल ,जर भविष्यात बेरोजगार भत्ता म्हणुन ई-श्रम कार्ड धारकांना दिला जाईल.कुशल व अकुशल नौकरीच्या शोधात असणाऱ्या कामगारांना सहज नौकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . शिवाय शासनाच्या नव्या प्रोजेक्ट मध्ये ई-श्रम कार्ड धारकांना प्राधान्य देण्यात येईल. ई-श्रम कार्ड धारकांना त्यांच्या कौशल्यानुसार काम उपलब्ध झाले नसल्यास ,अशा ई-श्रम कार्ड धारकांना मासिक 3 हजार ते 5 हजार रुपये मासिक पेन्शन स्वरुपात मानधन मिळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकार आहे .
ई-श्रम कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागतपत्रे- आधार कार्ड , आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणारा नंबर चालु असावा ,बँक खाते ,उत्पन्नाचा दाखला , रहिवाशी पुरावा ,वयाचा पुरावा ,पासपोर्ट साईज फोटो .
ऑनलाईन ई-श्रम कार्ड रजिस्ट्रेशन करण्यासाठी E-shram portal वर जावुन रजिस्ट्रेशन करु शकता व ई-श्रम कार्ड प्राप्त करु शकता .