राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची खुशखबर ! थकबाकी अदा करणे बाबत ,महत्वाचा शासन निर्णय दि.15.02.2022.

Spread the love

राज्य शासनाच्या अधिनस्त असलेल्या उद्योग विभागाअंतर्गत असलेल्या संचालक , शासन मुद्रण लेखनसाम्रगी व प्रकाशने संचालनालय व इतर विभागाअंतर्गत कार्यरत असलेले व सेवानिवृत्त झालेल्या अनुरेखक / कनिष्ठ आरेखक / वरिष्ठ आरेखक /प्रमुख आरेखक यांना दि.01/01/1996 ते दि.31/03/2006 या कालावधीतील वेतनाची थकबाकी अदा करणेबाबत महत्वाचा शासन निर्णय दि.15.02.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .

उद्योग विभागाअंतर्गतर कार्यरत असलेल्या अनुरेखक / कनिष्ठ आरेखक / वरिष्ठ आरेखक /प्रमुख आरेखक या पद संवर्गातील पदांना आश्वासित प्रगती योजना मंजुरी करण्यात आलेल्या नव्याने सुधारित वेतनश्रेणीनुसार देय असणारे दि.01 जानेवारी 1996 ते दि.31 मार्च 2006 या कालावधीमधील वेतनाची थकबाकी मंजुर करण्यात येत आहे. सदरची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्यात यावी असा आदेश देण्यात आला आहे .

शिवाय या कालावधी मधील कर्मचारी सेवानिवृत्त किंवा मृत्यु झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर रक्कम रोखीने प्रदान करण्यात यावी .सदरचा खर्च वेतन व भत्ते या लेखाशिर्षाखाली खर्च टाकण्यात यावेत असा आदेश देण्यात आला आहे.

याबाबतचा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करुन सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करु शकता .

शासन निर्णय

Leave a Comment