निवृत्तीवेतन योजना (पेन्शन ) वसुली संदर्भात आजचा महत्वाचा शासन निर्णय . दि.17.02.2022

Spread the love

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दि.17.02.2022 रोजी वित्त विभागाचा महत्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सक्तीने सेवानिवृत्ती / बडतर्फी किंवा सेवेतून काढूण टाकल्यास अशा प्रकरणी अंशदान परतावा तसेच वसुली करण्याबाबत  कार्यवाही कशा करावेत याबाबत शासन निर्णयामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत.

कर्मचाऱ्यांचा वरील नमुद प्रकरण बाबत  सेवेतुन बडतर्फ केल्यास त्या कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतन खाती जमा असणारी रक्कम व्याजासह देणेबाबत राज्य शासनाने यापूर्वीच्या आदेशामध्ये निर्देश देण्यात आलेले होते , परंतु कर्मचाऱ्याकडे बाकी असणारे अग्रीम व इतर आर्थिक रक्कमा बाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नव्हते .यामुळे हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

यामध्ये कर्मचाऱ्याकडे सर्व प्रकारचे शासनाचे येणे बाकी असणारी रक्कमा कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतन योजना मध्ये जमा असणाऱ्या रक्कमा मधुन कपात करण्यात यावीत.जर वसुली संदर्भात कर्मचाऱ्यांने आर्थिक हानीची न्यायालयीन दावा केल्या प्रकरणी त्या कर्मचाऱ्याच्या अंशदानाच्या परताव्याच्या रकमेतून सदर येणे वसुल करण्यात यावीत .

सदरचा निर्णय जिल्हा परिषदा /अनुदानित शाळा /विना अनुदानित शाळा /कृषी विद्यापीठे व संलग्न विद्यापीठे  मध्ये / मान्यता प्राप्त शाळा मधील कर्मचाऱ्यांना लागु राहील .

याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे .

Leave a Comment