राज्य शासनाच्या सेवेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी लेखाविभागाकडुन महत्वपुर्ण सुचना निर्गमित झालेले आहेत .या सुचनांचा अवलंब करण्यात यावा .जेणेकरुन सेवानिवृत्तीनंतर पेन्शन साठी कोणतीही अडचण येणार नाही .कोणकोणत्या सुचना देण्यात आलेले आहेत ते खालीलप्रमाणे पाहुयात .
- बदली झाल्यानंतर कर्मचाऱ्यांने जर दुय्यम सेवापुस्तक केले असल्यास ,तशी नोंद मुळ सेवापुस्तकात घेवून कर्मचारी स्वाक्षरी घ्यावी.
- जर स्त्री कर्मचाऱ्यांने वैद्यकिय खर्च आई वडीलांना प्रतिपुर्तीसाठी निवड न करता सासु व सासऱ्यांची निवड केली असल्यास तशी नोंद घेण्यात यावी.
- सेवापुस्तकावरील पहील्या पानावरील नोंद ही दर पाच वर्षांनी संबंधित अधिकाऱ्यांकडुन प्रमाणित करुन घ्यावी.
- दरवर्षी सप्टेंबर महीन्याच्या अखेर मुळ सेवापुस्तकातील नोंदी दुय्यम सेवापुस्ताकामध्ये घेण्यात यावीत .
- कर्मचाऱ्याचा सेवार्थ आय .डी ,प्रान नंबर , आधार नंबर , पॅन क्रमांक त्याचबरोबर डी.डी.ओ कोड एका स्वंतत्र पानावर लिहुन , सेवापुस्तकाला चिटकवण्यात यावे.
- कार्यमुक्त / रुजु अशा प्रकरणी मध्यान्न पुर्व /मध्यानानंतर अशा नोंदी आवश्यक नमुद करावेत .
- निवृत्तीवेतन साठी आवश्यक आर्हताकारी नसणारा कालावधी हा निळया शाईने न लिहता लाल शाईचा वापर करुन दर्शविण्यात यावा.
- ज्या वेळेस नामनिर्देशन अद्ययावत केले जातात त्या वेळेस त्याप्रकारची नोंद सेवापुस्तकाद घ्यावी.
- वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये सेवापुस्तकामध्ये वेतन विषयक नोंदी नमुद करत असताना,महागाई भत्ता ची नोंद स्वंतंत्रपणे घेण्यात यावी.
- कर्मचाऱ्याची वैयक्तिक नस्ती ही संबंधित कार्यालयामध्ये नोंदीसाठी असते , त्यामुळे कर्मचाऱ्याची सर्व प्रकारची नोंदी सेवापुस्तकामध्ये घेण्यात यावी.