राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे .ती म्हणजे कर्मचाऱ्यांना आता मुख्यालयीच रहावे लागणार आहे .जर मुख्यालयी वास्तव्यास नसल्यास अशा कर्मचाऱ्यांचा पगार बंद केला जाणार आहे.
राज्य शासनाने नुकतेच शासन निर्णय काढले असुन राज्य प्रशासन सेवेतील वर्ग -3 मध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षक , मुख्याध्यापक ,तलाठी , ग्रामसेवक अशा कर्मचाऱ्यांना मुख्यालयी रहावे लागणार आहे .यामुळे स्थानिक विकासाच्या कामास गती मिळणार आहे .
या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे . कारण कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी कायम जावु लागते त्यामुळे अनेक कर्मचारी वास्तवास शहरी / तालुक्याच्या ठिकाणी वास्तव करतात .
राज्य शासनाने याबाबत अधिकृत्त शासन निर्णय काढल्याने कर्मचाऱ्यांना आता मुख्यालयी राहणे बंधनकारक राहील .यामुळे पेंडीग कामकाजाला चांगली गती येईल व विकास कामास हातभार लागेल असे शासनाचे म्हणणे आहे.