मा.अजितदादांनी कर्मचाऱ्यांना दिली मोठी खुशखबर !३% DA वाढीसह इतर मागण्यांवर सकारात्मक धोरण .

Spread the love

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी 23 व 24 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यव्यापी संप चालु आहे .कर्मचाऱ्यांचा या मागण्या चर्चेने सोडविले जाणार असुन ,मा.अजितदादा यांनी विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीस बोलावले आहे.या बैठकित कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली जाणार आहे.

मा.अजितदादांनी कर्मचाऱ्यांना संपामध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.सर्व प्रश्नावर सकारात्मक निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात येइल येइल .असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेवून स्पष्ट केले आहे.या बैठकित कर्मचाऱ्यांचा मागील चार महिन्यापासुन प्रलंबित असणारा वाढीव 3 टक्के महागाई भत्ता बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

त्याचबरोबर सेवानिृत्तीचे वय 60 वर्षे व जुनी पेन्शन योजना लागु करण्याबातच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.यासाठी राज्य शासनाकडुन आज 11 वाजता चर्चेसाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले आहे.

आजच्या संपामध्ये कर्मचाऱ्यांनी सहभागी न होता नियमित कामकाजासाठी कार्यालयात हजर होण्याचे आवाहन मा . अजितदादांनी केले आहे.

Leave a Comment