महायुद्धाची सुरुवात ! भारत कोणाच्या बाजुने जाणार ,युक्रेनने मागितली भारताची मदत .

Spread the love

रशियाने केलेला युक्रेनवरचा हल्ला हा दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात भयंकर हल्ला असल्याचा दावा होत आहे.शिवाया रशियावर जागतिक पातळीवर निंदा सुद्धा केली जात आहे.कारण युक्रेनसारख्या कमकुवत राष्ट्रावर हल्ला केल्याने युक्रेनचे जनजीवन संपुर्ण विस्कळीत झाले आहे.

आतापर्यंत रशियाने युक्रेनला सर्व बाजुंनी घेरले असले तरी युक्रेन रुसला जवाबी प्रतिहल्ला करत आहे. युक्रेन असा दावा करत आहे कि ,आतार्यंत युक्रेनने रुसचे 800 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले आहे ,तर युक्रेनचे 180 सैन्य शहीद झालेले आहेत. त्याचबरोबर रुसकडुन वारंवार हवाई हल्ले जरी होत असले तरी आतार्यंत रुसचे 6 हवाई विमान व 7 हेलिकॉप्टर हवेतच नेस्तनाभूत केले आहे.

अमेरिकेसह या देशांचा युक्रेनला मदत

सध्या युक्रेनला कोणत्याही देशांने प्रत्यक्ष सैनिकी मदत केली नसली तरी अमेरिकेने रणगाडे व इतर शस्त्राचा पुरवठा करण्याचे आश्वासने दिली आहेत.त्याचबरोबर ब्रिटन , लिथुआनिमा , एस्टोनिया ,लॅटव्हिया , चेक प्रजासत्ताक या देशांनी मदत करण्यासाठी सरसावले आहेत.त्याचबरोबर नाटो देशांनी सुद्धा युक्रेनला सैनिकी व शस्त्रांची मदत करण्यासाठी नाटोची महत्वाची बैठक पार पडणार आहे.

युक्रेनने मागितली भारतासह पाश्चिमात्य देशांची मदत

युक्रेनला रुसने सर्व बाजंनी घेरल्यांने युक्रनने भारतासह इतर पाचिमात्य देशांची सैनिक मदत मागितली आहे. तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेने युक्रेनला या संकटात वाचवण्यासाठी मदत करावी अशी मागणी युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी केली आहे .

Leave a Comment