राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना दि.24 फेब्रुवारी 2022 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे .कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते अदा करणेबाबत राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरित करण्यात आले आहे .
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत महाराष्ट्र जिल्हा परिषद/पंचायत समिती मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते अदा करण्यासाठी सहायक अनुदाने लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यासाठी 16 कोटी 30 लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे .सदरचा निधी हा केवळ वेतन व भत्ते या बाबीवरच खर्ची टाकण्यात यावा अन्यथा वित्तीय अनियमितता समजण्यात येईल .
सदरचा खर्च महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील आस्थापना खर्च व नियमित आस्थापना खर्च या लेखाशीर्ष खाली खर्ची टाकण्याचे शासन निर्णय नुसार आदेशीत करण्यात आले आहेत .
त्याचबरोबर सदर अनुदाने ऑनलाइन ECS द्वारेच करावे ऑफलाईन पध्दतीने करण्यात येऊ नयेत असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत .त्याचबरोबर अनुदान वितरित करताना वित्त विभागाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे .


