लवकरच मिळणार खुशखबर ! अजितदादा राज्य कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने वेळेत पुर्ण करणार.

Spread the love

राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना मा. अजितदादा यांनी दिलेली आश्वासने वेळेत पुर्ण करतील .अशी आशा राज्य कर्मचाऱ्यांना लागली आहे .राज्य कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप , मा. अजितदादा यांच्या आश्वानाने समाप्त झाला होता . अजितदादा कर्मचाऱ्यांचे प्रलिंबित प्रश्न वेळेत पुर्ण करणार असुन , यासाठी यंत्रणा कार्यन्वित केली आहे.

जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतच्या मुख्य प्रश्न सोडविण्यासाठी मा.अजितदादा पवार यांनी दोन महिन्याचा वेळ मागितला आहे . याबाबत विचार करुन दोन महिन्यात राजस्थान सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता केंद्र सरकारप्रमाणे लागु करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबातच्या मागणीवर लवकरच राज्य शासनाकडुन सकारात्मक निर्णय घेतल जाणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारप्रमाणे वाढीव महागाई भत्ता 01 जुलै 2021 पासुनच लागु करण्याचे आश्वासने दिले आहे . त्यामुळे महागाई भत्ता फरक मिळण्याचा प्रश्न मिटला आहे.

हे सर्व प्रश्न मार्गी लावून याबाबत , लवकरच राज्य शासनाकडुन शासन निर्गमित केले जाणार आहे .

Leave a Comment