सरकारी कर्मचाऱ्यांना आली आनंदाची बातमी ! माहे एप्रिलपासुन मिळणार वाढीव भत्ता .

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना आली आनंदाची बातमी ! माहे एप्रिलपासुन मिळणार वाढीव भत्ता .

केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाकोरोना महामारीमुळे ,महागाई भत्ता गोठविण्यात आला होता . आता देशाची व राज्याची आर्थिक स्थिती रुळावर आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापासुन महागाई भत्ता मध्ये वाढ करण्याचे अर्थमंत्रालयाकडुन सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत.

केंद्रशासनाच्या सेवेत 498 लाख कर्मचारी कार्यरत असुन , 66 लाख निवृत्तीवेतन धारक कर्मचारी आहेत . या कर्मचाऱ्यांना दरवर्षी जानेवारी व जुलै असे ,वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढविला जातो .या आर्थिक वर्षात जुलै 2021 पासुन 28 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात आला आहे . शिवाय केंद्र सरकारने आणखीण वाढीव 3 टक्के महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आला आहे .

जानेवारी 2022 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मध्ये 3 टक्के वाढ मिळणार आहे . हा वाढीव महागाई माहे एप्रिल महिन्यापासुन , प्रत्यक्ष लागु करण्यात येणार आहे . जानेवारी व फेब्रवारी महिन्याचा डी . ए. फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. ग्राहक मुल्य सूचकांक मधील वृद्धी झाली आहे . यामुळे  कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा 34.04 टक्के दराने मिळणे अपेक्षित आहे. वाढीव महागाई भत्ता एप्रिल पासुन लागु करण्याबाबतच्या प्रस्तावाला अर्थमंत्रालयाने हिरवा कंदील दर्शविला आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना देखील मिळणार वाढीव महागाई भत्ता

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3 टक्के वाढीव डी . ए लागु केला जाणार आहे.

Leave a Comment