कोरोना महामारीच्या संकटामुळे केंद्र व राज्य सरकारने , कर्माचाऱ्यांचा 18 महिनेसाठी DA गोठविण्यात आला होता .या 18 महिने कालावधी मधील महागाई भत्ता नियमित कर्मचाऱ्यांना दिला जाणार नाही .असे नुकतेच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे .
केंद्र सरकारने या 18 महिने कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला आहे . कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधीनुसार कर्मचाऱ्यांना महागाई दिला आहे .त्याच धर्तीवर राज्य शासनाने आखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ दिला आहे .परंतु राज्य शासन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे.
18 महीने कालावधी मधील DA दर
या 18 महीने कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेल्या , कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे लाभ मिळेल. DA मिळेल .01 जानेवारी 2020 रोजी DA मध्ये 04 टक्के वाढ असणार आहे. 01 जुलै 2020 रोजी DA मध्ये 03 टक्के वाढ असणार आहे .जानेवारी 2021 मध्ये DA 04 टक्के वाढ असणार आहे. या 18 महीने कालावधीमधील DA केवळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच लाभ दिला जाणार आहे.
याबाबतची अधिकृत्त घोषणा लवकरच करण्यात येणार आहे .यामुळे या कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना DA चा लाभ मिळणार आहे.