महागाई भत्ता थकबाकी बाबत मोठी अपडेट ! कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ .

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना थकबाकीबाबत मोठी अपडेट आली आहे .कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम माहे एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत , रोखीने दिला जाणार आहे .याबाबतची सविस्तर अपडेट खालीलप्रमाणे आहे .

राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2021 पासुन महागाई मध्ये , 11 टक्के वाढ करण्यात आली आहे .परंतु ही 11 टक्के DA वाढ ऑक्टोंबर 2021 पासुन देण्यात आली .यामुळे जुलै ते सप्टेंबर या तीन महीने कालावधी मधील  DA फरक बाकी आहे .हा DA फरक कर्मचाऱ्यांना रोखीने दिला जाणार आहे .याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन सकारात्मक बातमी आली आहे .

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा ,DA फरकाचा लाभ मिळणार आहे .DA फरकाची रक्कम 11 टक्के असल्याने , कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.

18 महिने कालावधी DA

कोरोनाच्या महामारीमुळे कर्मचाऱ्यांचा 18 महिने कालावधीसाठी DA गोठवण्यात आला होता .या 18 महीने कालावधी मधील DA बाबत राज्य सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही .परंतु या कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना DA चा लाभ मिळणार आहे .

 

Leave a Comment