राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकामध्ये अनेक आक्षेप सुवानिवृत्तीनंतर घेण्यात येतात . यापैकी काही महत्वाचे आक्षेप खालीलप्रमाणे विशद करण्यात आलेले आहेत.
- सेवापुस्तकातील रजालेखा अपुर्ण / रजा लेखा चुकीचा असणे .
- वेतननिश्चितीसाठी विकल्प न घेणे .
- सेवापुस्तकात मराठी / हिंदी भाषा सुटची नोंद नसणे .
- चारीत्र्य पडताळणी झाल्याबाबतची नोंद नसणे .
- स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद नसणे .
- स्वग्राम घोषित केल्याबाबतची नोंद नसणे .
- टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण नोंद नसणे.
- कार्यालय प्रमुखाने पहील्या पानावरील नोंद प्रमाणित न करणे . (दर 5 वर्षांनी )
- गटविमा योजना वर्गणी कपात रक्कम नोंद नसणे.
- सेवापुस्तक पडताळणी नोंद नसणे .
- पदोन्नतीची वेतननिश्चिती चुकिच्या वेतनस्तरावर करणे .
- रक्कमांचे अतिप्रदान होणे.
- रजा रोखीकरणाचे अतिप्रदान .
- नामनिर्देशन प्रमाणपत्राची नोंद नसणे.
- आश्वासित प्रगती योजना चुकीच्या वेतनश्रेणीवर लावणे.
- एकस्तर वेतनश्रेणी चुकीच्या वेतनावर लावणे.
वरील आक्षेप हे महत्वाचे आहेत .त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीपुर्वीच वरील आक्षेपाची पुर्तता करुन घ्यावी .ज्यामुळे सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी अडचण येणार नाही.