कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट ! 18 महीने कालावधी मधील महागाई भत्ता बाबत सरकारकडुन स्पष्टीकरण .

Spread the love

कोरोना रोगाच्या साथीमुळे केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांना 18 महिने  DA गोठविण्यात आला होता . या कालावधी मधील महागाई भत्ता दिला जाणार अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांची होती . परंतु सरकारकडुन याबत स्पष्टीकरण आले आहे .

केंद्र सरकारला या 18 महीने कालावधीमधील महागाई भत्ता बाबत विचारले असता , सरकारकडुन या कालावधी मधील DA बाबत कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे .यामुळे केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या 18 महीने कालावधीमधील DA मिळणार नसल्याचे चिन्हे दिसुन येत आहेत.

परंतु या 18 महीने कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना DA चा लाभ मिळणार आहे .केंद्र सरकारने या कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना DA लाभ दिला आहे . राज्य सरकारने देखिल महाराष्ट्र शासन सेवेतील आखिल भारतीय सेवा मधील कर्मचाऱ्यांना 18 महीने कालावधीमधील DA लाभ दिला आहे.

लवकरच राज्य शासन सेवेतील या 18 महीने कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. म्हणजेच या 18 महीने कालावधीमधील DA लाभ केवळ या कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेल्याच कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.

Leave a Comment