फिटमेंट फॅक्टर 3.68 वाढीमुळे , राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार मुळ वेतनात मोठी वाढ !

Spread the love

कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 टक्केने मुळ वेतन मिळते .कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्केनी वाढवण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडुन होत आहे . जर वेतनाचा फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्के केल्यास ,मुळ वेतनात  वाढ होईल .

सातवा वेतन आयोगानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन 18000/- आहे . यामध्ये वाढ होऊन ,किमान मुळ वेतन हे 26000/- होईल .मुळ वेतनात तब्बल 8 हजार रुपयांची वाढ होईल .त्याचप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगानुसार , किमान मुळ वेतन 15000/- आहे .फिटमेंट फॅक्टर 3.68 झाल्यास ,राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन 21100/- होईल .

याबाबत केंद्र सरकार कडुन लवकरच निर्णय घेतले जाणार आहे .फिटमेंट फॅक्टरचा प्रत्यक्ष संबंध हा मुळ वेतनाशी आहे . यामुळे हे प्रमाण वाढल्यास मुळ वेतनात वाढ होते .यापुर्वी सन 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर 2.58 टक्के करण्यात आला होता . फिटमेंट फॅक्टर वाढीमुळे कर्मचाऱ्यांना निश्चितच मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

Leave a Comment