राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यासंदर्भात महत्वाची अपडेट .

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांना राजस्थान सरकारच्या धर्तीवर,जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे .परंतु ही योजना लागु केल्यानंतर अनेक त्रुटी निर्माण होण्याच्या शक्यता आहेत .यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना या योजनेचे नुकसान सुद्धा होणार असल्याची बाब दिसुन येत आहे .

यामध्ये प्रामुख्याने NPS योजनेतील रक्कम शेअर मार्केटवर अवलंबुन आहे . त्यामुळे सध्या शेअर मार्केटचा उच्चांक खुपच कमी आहे . यामुळे कर्मचाऱ्यांची NPS टायर 01 मधील रक्कम कमी झाली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या NPS मधील गुंतवणुकीवर व्याज भ.नि.निधीप्रमाणे मिळणार नाही .

त्याचबरोबर जे कर्मचारी NPS योजनेमध्येच सेवानिवृत्त झाले आहे . अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे . त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीसाठी कमी कालावधी आहे . अशा कर्मचाऱ्यांना NPS मधील रक्कम शासनाच्या भ.नि.निधीमध्ये जमा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे .जे की , जुनी पेन्शनप्रमाणे सेवानिवृत्तीच्या कालावधी मध्ये 90 टक्के कर्मचाऱ्यांना काढण्याची मुभा आहे .

भ.नि.निधी योजना लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध टप्यामध्ये रक्कम काढता येते . परंतु NPS योजना मधील कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट रक्कमच काढता येते . तेही विशिष्ट नमुद कारणासाठीच काढता येते .कर्मचाऱ्यांची अशी मागणी आहे की ,जुनी पेन्शन योजना लागु केल्यास त्वरीत भ.नि.निधी योजनाप्रमाणे लाभ लागु करावे .यामुळे कर्मचाऱ्यांना जमा रक्कमांचा आर्थिक लाभ घेता येईल .

Leave a Comment