राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर वाढीव महागाई भत्ता लागु करण्याबाबत ,राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक होणार आहे.कर्मचाऱ्यांना दि.23 फेब्रवारी रोजी दिलेला आश्वासने मा. अजितदादा लवकरच पुर्ण करण्याबाबत सकारात्मक भुमिका घेणार आहेत.
मा.अजितदादा यांच्या अध्यक्षेतीखाली ,वित्त विभागाशी वाढीव महागाई भत्ता अदा करणेबाबत सखोल चर्चा केली जाणार आहे .यामध्ये महागाई भत्ता 01 जुलै 2021 पासुन लागु करुन त्या दिवसापासुनचा महागाई भत्ता फरक अदा करण्यात येणार आहे . यासाठी या आर्थिक वषामध्ये महसुली खर्च वजा जाता अनुदान उपलब्धेनुसार महागाई भत्ता फरक अदा केला जाईल.
मा.अजितदादा नेहमीच दिलेला शब्द पाळत असतात . त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने लवकरच पुर्ण करण्यासाठी कॅबिनेट बैठकाचे आयोजन केले जाणार असल्याचे सुत्रानुसार समजले आहे .यामुळे कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता बाबतची अपेक्षा लवकरच पुर्ण केली जाणार आहे .
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे विलंब न करता वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात येणार आहे .