केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे .ती म्हणजे ,मागील 18 महिने कालावधी मधील थकित महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .याबाबत केंद्र सरकारकडुन स्पष्ट करण्यात आले होते की , 18 महीने कालावधी मधील महागाई भत्ता देण्याबाबत , सरकारचा तुर्तास कोणताही विचार नाही .
केंद्र सरकारच्या अशा स्पष्टीकरणा नंतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी व्यक्त करण्यात आली . यामुळे केंद्रीय कामगार युनियन कडुन 18 थकित महागाई भत्ता बाबत पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे . याबाबत केंद्र सरकाच्या सचिवाची कॅबिनेट मिटींग लवकरच पार पडणार आहे .
यामुळे कर्मचाऱ्यांना या 18 महिने कालावधी मधील महागाई भत्ता मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत .या कालावधी मधील महागाई भत्ताची रक्कम ही खुप मोठी असणार आहे . जवळपास 50 हजार ते 2 लाख रुपयांपर्यत महागाई भत्ताची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणार आहे .
केंद्र सरकारने केवळ या 18 महीने कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात आली आहे .याबाबत लवकरच कॅबिनेट सचिवाची बैठक पार पडणार आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.