GOOD BREAKING NEWS : राज्य कर्मचारी / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना , वाढीव 3 % महागाई भत्ता .

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचारी / पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात येणार आहे .ही वाढ राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2021 लागु करणे प्रस्तावित आहे .सध्या आर्थिक वर्षाचा MARCH ENDING चालु आहे . यामुळे महागाई भत्ता बाबत तुर्तास निर्णय घेतला जात नाही .

मार्च महीन्यात या वर्षातील सर्व प्रलंबित बाबीसाठी निधी वितरीत करण्यात येत आहे .त्यामुळे महागाई भत्ता बाबतचा निर्णय अजुन लांबणीवर पडला आहे .परंतु माहे एप्रिल महीन्यात वाढीव महागाई भत्ता व DA फरक देण्याबाबत ,राज्य शासनाकडुन सकारात्मक बातमी समोर आली आहे .

महागाई फरकाची रक्कम मोठी असल्याने , तेवढा निधी सरकारकडे उपलब्ध होऊ शकणार नाही . यासाठी फरकाची रक्कम माहे एप्रिल महीन्या अदा करण्यात येईल . परंतु या आर्थिक वर्षामध्ये महसुली खर्च वजा जाता , निधी शिल्लक राहील्यास जुलै ते सप्टेंबर या कालावधी मधील DA फरक अदा करण्यात येईल .

वाढीव 3 टक्के महागाई भत्ता सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना विलंब न करता , लगेचच लागु करण्यात येणार आहे .शिवाय DA फरक रक्कम पहिल्या टप्यामध्ये पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना अदा केले जाणार असल्याची सकारात्मक बातमी समोर आली आहे .

Leave a Comment