राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3 टक्के महागाई भत्ता मिळालेला नाही . परंतु राज्यातील कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता बाबत मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे .ती म्हणजे , राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या महागाई भत्ता वाढीप्रमाणे DA मिळणार आहे .
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2021 पासुन 31 टक्के दराने महागाई मिळत आहे . आता जानेवारी 2022 पासुन आणखीण वाढीव 3 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई मिळणार आहे.कारण केंद्रीय EICPI निर्दशांकानुसार ,महागाई भत्ता 34 दराने मिळणे अपेक्षित आहे .म्हणुनच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन वाढीव 3 टक्के महागाई लागु करणे प्रस्तावित आहे .
याच केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासन कर्मचाऱ्यांना DA वाढ देण्याची दाट शक्यता आहे . कारण राज्य कर्मचारी राज्य शासनावर मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त करत आहेत .यामुळे कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी , लवकरच महागाई भत्ता केंद्राप्रमाणे 34 टक्के करण्यात येणार आहे .
याबाबत अधिकृत्त घोषणा राज्य शासनाकडुन लवकरच केले जाणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा DA बाबत मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.