मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प योजना अंतर्गत ग्रामीण भागात शेतमाल , शेळ्या ,कुक्कुटपालन उपप्रकल्पांना अर्थसहाय्य केले जाते . ही योजना महाराष्ट्र सरकारतर्फे राविण्यात येते .याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहुयात.
उद्देश – या स्मार्ट प्रकल्पां अंतर्गत राज्यातील कृषी उत्पादन कंपन्या ,महिला आर्थिक विकास महामंडळ ,शेतकरी उत्पादक कंपन्या इ. ग्रामीण पातळीवर स्थापित कंपन्यांना शेतमाल , शेळ्या ,कुक्कुटपालन उपप्रकल्पासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते .जणेकरुन ग्रामीण पातळीवर उत्पादनास वेग येईल व रोजगारांच्या संधी उपलब्ध होईल .
पात्रता – कृषी उत्पादन कंपन्या ,महिला आर्थिक विकास महामंडळ ,शेतकरी उत्पादक कंपन्या ,त्याचबरोबर ग्रामीण भागात शेतकरी व महीलांमार्फत स्थापित संस्था इ.संस्था या स्मार्ट प्रकल्पातुन अर्थसहाय्य करण्यास पात्र राहतील .
अर्ज कसा कराल – सर्व प्रथम अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती www.smart-mh.org या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन देण्यात आली आहे .सदर संकेतस्थळावरील अर्ज भरुन आपल्या जिल्ह्यातील प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय/जिल्हा कृषी कार्यालयात अर्ज सादर करावा. शिवाय वरील नमुद संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक ही 31 मार्च 2022 अशी आहे.