सरकारी कर्मचाऱ्यांना होळी सणा अगोदरच मिळणार, DA वाढीसह इतर आर्थिक लाभ !

Spread the love

केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळी सणाच्या अगोदरच वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा वेतनाचा फिटमेंट फॅक्टर लवकरच वाढवण्याची शक्यता आहे . यामुळे कर्मचाऱ्यांचा मुळ वेतनात वाढ होणार आहे.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना आणखीण वाढीव 3 टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे . या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्के होणार आहे . त्याचबरोबर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2021 पासुन ते आतापर्यंतची महागाई भत्ता फरकाची रक्कम दिली जाणार आहे . याबाबत केंद्र सरकारची अधिकृत्त बैठक पार पडली आहे .

सध्या पाच राज्यामध्ये निवडणुका चालु असल्याने याबाबतची घोषणा ,  आचारसंहिता मुळे करु शकत नाही . म्हणुन याबाबतची अधिकृत्त घोषणा होळी सणापुर्वी केंद्र सरकार कडुन केली जाईल . यामुळे केंद्र सरकारी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या वाढीव DA चा लाभ मिळणार आहे .

त्याचबरोबर सध्या मिडीया मध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चर्चेत असणारा फिटमेंट फॅक्टर मध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे . याबाबतची अधिकृत्त घोषणा केंद्र सरकारकडुन लवकरच करण्यात येणार आहे .

Leave a Comment