अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांकडुन या बाबींसाठी निधीची मागणी !

Spread the love

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालु आहे . हा अर्थसंकल्प कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा आहे .कारण कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रकरणे देयकासाठी भरीव तरतुदीची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडुन आहे .या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांकडुन कोणत्या मागणी करण्यात आल्या आहेत .ते खालीलप्रमाणे पाहुयात .

यामध्ये प्रामुख्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव 3 टक्के महागाई भत्ता लागु करण्यासाठी निधीची तरतुद करण्यात यावी . त्याचबरोर हा वाढीव DA केंद्र सरकार प्रमाणे जुलै 2021 पासुन लागु करण्यात यावा .व तेंव्हापासुनचा DA फरकाची रक्कम अदा करण्यासाठी बजेटमध्ये निधीची तरतुद करण्यात यावी .

सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता अदा करण्यासाठी पुरेश्या निधीची तुरतुद करण्यात यावी .त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना पहीला व दुसरा हप्ता अद्यापर्यंत मिळाला नाही . अशा कर्मचाऱ्यांना पहिला व दुसरा हप्ताची रक्कम अदा करण्यासाठी निधीची तरतुद करण्यात यावी .

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची विशेष निधीची मागणी

राज्य शासन सेवेतुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अनेक आर्थिक बाबी प्रलंबित आहेत . यामुध्ये प्रामुख्याने 18 महीने कालावधीमध्ये सेवाविृत्त झाले आहेत . अशा कर्मचाऱ्यांना महागाई भता फरकाची रक्कम तात्काळ अदा करावी .यासाठी विशेष निधीची तरतुद करण्याची मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडुन करण्यात आली आहे .

Leave a Comment