सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत , राज्य शासनाकडुन घेतला जाणार सकारात्मक निर्णय .

Spread the love

केंद्र व इतर 22 घटक राज्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात आले आहेत . सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत कर्मचाऱ्यांची जुनी मागणी आहे . या मागणीला अनेकांनी विराध देखिल दर्शविला आहे .राज्याचे उपमुख्य सचिव यांनी मा.मुख्यमंत्री यांना पत्र लिहुन सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे कायम ठेवण्याची विनंती केली आहे .कारण राज्यात बेरोजगारीची संख्या वाढण्याची भिती निर्माण होवु शकते

त्याचबरोबर बऱ्याच कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की , सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षेच कायम ठेवावे . परंतु कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे लागु होणारे वेतन व भत्ते त्वरीत लागु करण्यात यावेत . तसेच सेवानविृत्तीनंतर तात्काळ पेन्शन योजना लागु करण्यात यावी . त्याचबरोबर 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी .

आताच्या घडीला 28 वर्षाच्या नंतर शासन सेवेत रुजु होण्याचे प्रमाण मोठे आहे . यामुळे अनेक कर्मचारी वयाच्या 28 ते 45 वयापर्यंत शासन सेवेत रुजु होतात .अशावेळी सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे असल्यास अशा कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो .म्हणुन सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे . याबाबत राज्य सरकारचे देखिल सकारात्मक धोरण आहे . याबाबत लवकरच निर्णय राज्य शासनाकडुन घेतला जाणार आहे.

देशामध्ये केंद्र सरकारसमवेत , 22 घटकराज्यांनी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे .जेणेकरुन कुशल /अनुभवी मनुष्यबळाचा वापर उत्तम प्रशासन चालविण्यासाठी होईल .

3 thoughts on “सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत , राज्य शासनाकडुन घेतला जाणार सकारात्मक निर्णय .”

  1. चालू अधिवेशनात निवृत्ती चे वय 58 वरून 60 वर्षे हा कायदा लवकरात लवकर लागू व्हायला पाहिजे, जेणेकरून उशिरा सेवेत रुजू झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईल व त्याबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेत, बेस्ट, सार्वजनिक उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांना सर्वांना च निवृत्ती चे वय 58 वरून 60 वर्षे करावे ही विनंती

    Reply
  2. 25 state maday age of retirement 60 ahey.thithy unemployment nahi ka? Fakth Maharashtra bayrozegari ahey.60 yers vailach pahijay ya adiveshnat.length of service kami hoth ahey.maharashtra var annia hota kama naye

    Reply

Leave a Comment